बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याकडेला गेल्या चार दिवसांपासून असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या एका वृद्धेला तेथील ऑटोरिक्षा चालकांनी हेल्प फॉर नीडीच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली.
बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर रस्त्याशेजारी गेल्या चार दिवसापासून एक वृद्ध महिला अंगावरील जीर्ण कपड्यानिशी असहाय अवस्थेत पडून होती.
सदर वृद्धेला उपचाराची गरज असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे स्थानक ऑटोरिक्षा स्टँड येथील रिक्षा मालक गौतम कांबळे यांनी त्या महिलेबाबतची माहिती हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना दिली.
सदर माहिती मिळताच आज सकाळी अनगोळकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेसह रेल्वे स्थानकाकडे जाऊन त्या वृद्धेची विचारपूस केली. तसेच वृद्धेबाबत माहिती दिल्याबद्दल त्यांनी रेल्वे स्थानक ऑटोरिक्षा चालक व मालकांचे आभार मानून यापुढेही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर रिक्षाचालकांच्या मदतीने त्या वृद्धेला हेल्प फॉर नीडीच्या रुग्णवाहिकेमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन दाखल केले. आपल्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबद्दल संबंधित वृद्ध महिला सुरेंद्र अनगोळकर यांना दुवा देत आहे.
Check Also
सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
Spread the love बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …