खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन मराठी भाषिक जनतेने गांभीर्याने पाळावा. सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी कडकडीत हरताळ पाळावा. तसेच शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष्य वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या संदर्भातील पत्रके आज 25 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर शहरात वाटण्यात आली.
यावेळी अध्यक्ष म. ए. समिती आणि माजी आमदार खानापूर श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. यशवंतराव लक्ष्मणराव बिर्जे, सरचिटणीस श्री. आबासाहेब नारायणराव दळवी, चिटणीस श्री. महादेव नारायण घाडी, शहर अध्यक्ष श्री. विवेक रामचंद्र गिरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. जयराम कृष्णाजी देसाई, नेते श्री. प्रकाश व्ही. चव्हाण, श्री. नारायण रामचंद्र लाड, माजी तालुका पंचायत सदस्य श्री. विठ्ठल निंगाप्पा गुरव, ग्राम पंचायत सदस्य श्री. रुक्माना शंकर झुंजवाडकर, श्री. डी. एम. गुरव, माजी तालुका पंचायत सदस्य श्री. रमेश वसंतराव देसाई, श्री. शिवाजी कल्लाप्पा पाटील, श्री. कृष्णा म्हात्रु मन्नोळकर, अध्यक्ष बहुविकास बँक खानापूर श्री. मुरलीधर गणपतराव पाटील, श्री. नारायण मल्लाप्पा पाटील, श्री. बी. बी. पाटील, श्री. रवी परशुराम पाटील, ग्राम पंचायत सदस्य माणिकवाडी श्री. शंकर आप्पाण्णा गावडा, श्री. मर्याप्पा मष्णू पाटील, श्री. ईश्वर मंगेश बोबाटे, श्री. डी. एम. भोसले गुरुजी, श्री. मल्हारी आप्पाजी खांबले, श्री. संदीप आ. पाटील इत्यादींच्या समवेत पत्रके वाटण्यात आली.
Check Also
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
Spread the love खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …