Saturday , March 7 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न; मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्याचे ठरले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचे वर्ष हे साठे प्रबोधिनीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिनाच्या औचित्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा कार्यक्रम 2 मार्च 2023 रोजी संपन्न होणार असून कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे काव्य संमेलन होईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कवी संमेलनासाठी आपल्या स्वरचित कविता दिनांक 25 फेब्रुवारी पर्यंत मराठी विद्यानिकेतन बेळगाव या ठिकाणी पाठवाव्यात. निवड झालेल्या कविता काव्य संमेलनामध्ये सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये ‘दोन महात्मे’ हा गीत गायनाचा कार्यक्रम होईल. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व महात्मा गांधींच्या हौतात्म्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या दोन महात्म्यांना वंदन करणारा संगीत गीतांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या नीला आपटे व शिक्षकवृंद सादर करणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे साठे प्रबोधिनीतर्फे कळविण्यात आले आहे.

बैठकीला प्रबोधिनीची चिटणीस सुभाष ओऊळकर, सदस्य सुरेश गडकरी, प्रा. सुरेश पाटील, प्रा. डी. टी. पाटील, विजय बोंगाळे, बी. बी. शिंदे, निला आपटे, हर्षदा सुंठणकर, इंद्रजीत मोरे, एन. सी. उडकेकर, गजानन सावंत, धीरज सिंह राजपूत, प्रसाद सावंत उपस्थित होते.

आभार इंद्रजीत मोरे यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *