बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मोर्चाबाबत व इतर विषयावर यावेळी चर्चा होणार आहे. म. ए. समिती पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला, कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी व सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.
म. ए. समितीचे आवाहन
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रदेशातील मराठी भाषिक युवक
व युवतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्जुननगर (निपाणी) येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा लाभ सीमा भागातील मराठी भाषिकांनी घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरणच समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी शां. अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे,
Belgaum Varta Belgaum Varta