बेळगाव – सालाबादप्रमाणे यावर्षीही शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
गेल्या 24 वर्षांपासून शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्र सोहळा आयोजित केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळपासून प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी भारत नगर शहापूर येथील श्रीमाता भक्ती महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी शहापूर, वडगाव, खासबाग, हिंदवाडी येथील भाविकांनी दिवसभर उपस्थिती दर्शविली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून रद्द करण्यात आला आहे. यावर्षीही वाढत्या गर्दीची दखल घेत महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta