बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला आदर्श ठरत होते. यामुळे आजही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे विचार भागोजी पाटील यांनी केले
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोडवरील कार्यालयात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मराठा बँकेचे संचालक सुनील अष्टेकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, युवाआघाडीचे चिटणीस मोनाप्पा संताजी, दीपक पावशे, सौरवसिंह पाटील, अनेक म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta