बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मुंबई येथे २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला येते वेळी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारीला सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी घेऊन येण्याचे आहे, या यादीमध्ये पुरुष किती महिला किती, सदरचा प्रवास रेल्वेने आहे की वैयक्तिक चारचाकी वाहनातून आहे. चारचाकी वाहनातून असेल तर त्या वाहनाचा क्रमांक समावेश करणे जरुरीची आहे. ही सर्व यादी एक पानावर लिहून घेऊन उद्याच्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta