Friday , April 17 2026
Breaking News

देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे उद्घाटन व शिवजयंती

Spread the love

 

देवरवाडी : देवरवाडी गावची वस्ती वसवल्यापासून प्रमुख गल्ल्यापैकी एक असणारी आणि वैजनाथ मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या मारुती गल्ली च्या नामफलकाचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज संपन्न झाले.
मारुती गल्लीमधील एमजी बॉईज (मारुती गल्ली बॉइज्) यांच्या पुढाकाराने या फलकाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती.
शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी किल्ले सामानगड येथून शिवज्योत आणून फलकाचे उद्घाटन गल्लीतील ज्येष्ठ व्यक्ती, आजी -माजी सैनिक, तसेच ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, गावातील विविध समित्यांचे पदाधिकारी व गल्लीतील रहिवासी महिलावर्ग युवक तसेच बालचमु यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण संपन्न झाले आणि गल्लीतील मुलींनी विशेष पेहराव करून ज्योतीचे स्वागत तसेच हाती भगवे झेंडे घेऊन ज्योत मिरवणूक केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि शिवमूर्तीचे व शिवज्योतीचे पूजन करून शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील

Spread the love  चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *