Wednesday , March 4 2026
Breaking News

एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत शैक्षणिक मदत

Spread the love

 

बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या (एसएसएएफ) एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जमा केलेला निधी नुकताच जोशी सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आला.

जोशी सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी एसएसएएफच्या सीईओ प्रेमा पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक निधीचा धनादेश स्वीकारला. एसएसएएफचया एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 167 गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सुमारे 20 लाख रुपयांची मदत देऊ करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांसह पदवीपूर्व, पदवी, पदविका, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *