Sunday , September 20 2026
Breaking News

धामणे विभाग म. ए. समिती बळकट करण्याचा निर्णय

Spread the love

 

बेळगाव : धामणे विभाग म. ए. समितीची कार्यकर्त्यांची गल्लीनिहाय बैठकीची पाचवी सभा बुधवार दि. 22/2/2023 संध्याकाळी 9 वाजता नवी गल्ली येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळू पायांना बेळगावकर हे होते.
प्रारंभी बाळू जायनाचे यांनी स्वागत केले. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यल्लाप्पा नागप्पा रेमानाचे माजी ग्रा. प. उपाध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले.
बाळू केरवाडकर, मनोहर जायनाचे, राहुल बाळेकुंद्री, विजय बाळेकुंद्री यांनी मनोगत वक्त केले.
दीपक बेळगावकर यांनी शिवशंभू युवक मंडळ नवी गल्लीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी शिवाजी पाटील, सोमनाथ मेलगे, बाळू बेळगावकर, महेश तारिहाळकर, राजू बेळगावकर, यल्लाप्पा चौगुले, प्रशांत बोकमूर, राजू बोकमूर, रोहित बोकमूर, उमेश बेळगावकर, दीपक बेळगावकर, जोतिबा भेकणे, सुंदर बेळगावकर, सतीश जायनाचे, सागर तारिहळकर, बसवंत डुकरे, कुमान्ना कोमनाचे, उदय बेळगावकर, सतीश तारिहाळकर, दीपक बाळेकुंद्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

किरण चतुर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *