बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिन धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन आचरणात आणण्यात येतो, यामुळे या समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळण्यात येतो. याविरोधात करवे संघटनेने कन्नड भाषिकांचा अपमान होत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करून समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करवेचे प्रवीण शेट्टी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
यावेळी बोलताना प्रवीण शेट्टी म्हणाले, बेळगावमधील कन्नड भाषिकांच्या भावना दुखावण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने नेहमी करण्यात येत आहे. बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन राज्यद्रोह करण्यात येतो. यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यात यावी तसेच राज्योत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनामार्फत जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष आर. अभिलाश, जिल्हा उपाध्यक्ष गुंडय्या हिरेमठ, जिल्हा प्रधान सचिव अमरेश, जिल्हा उपाध्यक्ष के. एस. खडकन्नवर, जिल्हा गौरवाध्यक्ष बाबू होसमनी, राजू, शशांक लद्दीमठ, मंजुनाथ शेट्टर, मल्लिका वागी आदींसह इतर उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …