Friday , October 18 2024
Breaking News

महाराष्ट्राने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे : युवा समिती

Spread the love

बेळगाव : बेळगावातील सीमाबांधवांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी होणार्‍या काळ्या दिनी उपस्थित राहून निषेध नोंदवावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि सीमा समन्वयक मंत्री शिंदे यांना देण्यात आले.
युवा समितीच्यावतीने आज मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. आणि विविध मागण्यांचे निवेदन यांना सादर करण्यात आले. सीमाभागातील जनता एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळते. आजतागायत सीमाभागातील 865 गावे या दिनाच्या निषेध नोंदवत आहेत मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून गांभीर्याने पाळावा व निषेध नोंदवत संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे हे दाखवून द्यावे. सर्व मंत्री आमदार खासदार यांनी काळे कपडे परिधान करून या दिवशी निषेध नोंदवत आणि सीमाभागातील मराठी जनतेला पाठिंबा दर्शवावा अशी मागणी यावेळी युवा समितीच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नारायण मुचंडीकर, वासू सामजी, प्रवीण रेडेकर, आकाश भेकणे, राजू कदम, जोतिबा पाटील, आशिष कोचेरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणी पत्नीला अटक; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Spread the love  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी संतोषची पत्नी उमा हिला अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *