Saturday , July 27 2024
Breaking News

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन

Spread the love

बेंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयाघाताने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अभिनय सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी दुपारी बेंगळूर येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये हृदयघाताने निधन झाले. पॉवर स्टार म्हणून ख्याती असलेले पुनीत राजकुमार यांच्यावर बेंगळूरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचाराचा कोणताही उपयोग न होता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीसह चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सॅण्डलवूडमधील सतत हसतमुख असणारे आणि अलौकिक नाव कमविले पुनीत राजकुमार हे सकाळी जिममध्ये कसरत करत होते. दरम्यान त्यांना चक्कर आल्याने त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना हृदयघाताचा झटका आल्याचे समजले. यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
आपल्या अभिनय कौशल्याने समस्त चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. लहानपणापासून डॉ. राजकुमार यांच्या चित्रपटांमध्ये काम करत तरुण वयात सर्वांच्या मनावर राज्य करत आपले अभिनय कौशल्य सादर करत पुनीत राजकुमार यांनी 49 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शोक व्यक्त केला आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे समस्त कर्नाटक स्तब्ध झाले असून पुनीत राजकुमार यांनी कर्नाटकासाठी आणि कन्नड चित्रपटसृष्टीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.
पुनीत राजकुमार यांच्या निधनावर राघवेंद्र राजकुमार यांनीही श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे. चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराच्या एक्झिटमुळे सार्‍या कर्नाटक तसेच पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *