बेळगाव : बेळगावातील नेहरू नगर येथे सेंट्रल या नावाने डिझायनर ब्युटिक हॉटेल सुरू करण्यात आले असून हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या असून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती ए. आर. हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेहरू नगर येथे नवे सेंट्रल हॉटेल सुरू करण्यात आले आहे. हॉटेलमधे चोवीस अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या चोवीस खोल्या आहेत.
मनोरंजनासाठी प्रत्येक खोलीत मोठे फ्लॅट स्क्रीन टिव्ही बसवण्यात आले आहेत. ऑलिव्ह या मल्टीकझिन रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी डिशीस उपलब्ध आहेत.
तांब्याच्या थाळीत पारंपरिक थाळी देखील ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय रुफ टॉप रेस्टोबार देखील ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांचा दर्जाही अत्यंत उच्च दर्जाचा आहे अशी माहितीही आनंद हेडा यांनी पत्रकार परिषदेत हॉटेलची माहिती देताना दिली.
बस स्थानकापासून हे हॉटेल दोन किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून हॉटेल पाच किलोमिटरवर आहे. विमानतळापासून हॉटेल पंधरा किलोमिटर अंतरावर असल्याने परगावाहून येणार्या प्रवाशांची या हॉटेलमुळे चांगली सोय झाली आहे. हॉटेलमध्ये वाढदिवस, कॉन्फरन्स आदींसाठी देखील सुविधा असून दीडशे व्यक्तींची व्यवस्था तेथे केली जावू शकते. हॉटेलचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नोस्ट्रा हॉस्पिटॅलिटी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला नोस्ट्रा हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक संचालक राजेश नायर, नोस्ट्राचे वरिष्ठ सल्लागार थिळक, ग्रुप जनरल मॅनेजर रमेश बाबू मालोथ, मॅनेजर अनिल कुमार आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
