बेळगाव : विविध रोगांच्या, आरोग्याच्या तक्रारींवर तपासणी करून सल्ला देण्यात मग्न डॉक्टर्स, नागरिकांच्या लागलेल्या रांगा आणि तपासणीसाठी येणार्या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणार्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, हे चित्र होते सांबरा येथे शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे!
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा आणि परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर तपासणी अन सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने भव्य आरोग्य शिबीर आज सांबरा येथे घेण्यात आले. केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि लक्ष्मीताई फौंडेशनच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांचे, स्त्रियांचे आजार, नेत्र, कान, नाक, त्वचा, श्वास विषयक समस्या, गुडघे-सांधेविषयक तक्रारी, दंतरोग, रक्तदाब, मधुमेह अशा सगळ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत तपासणी करून सल्ला व उपचार या शिबिरात देण्यात आले. एखाद्या सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक इस्पितळात मिळतात तसे उपचार या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आले. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कोरोना संकटामुळे सांबरा व परिसरातील लोकांना बेळगावला मोठ्या इस्पितळात जाऊन उपचार घेणे शक्य होईना झाले आहे. त्यामुळे एकाच छताखाली त्यांना सर्व आरोग्य सुविधा, उपचार उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांच्या दारात वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचा या परिसरातील लोक लाभ घेत आहेत. असे भव्य आरोग्य शिबीर घेण्याचे आश्वासन मी येथील लोकांना दिले होते. घरची मुलगी म्हणून ते पूर्ण केले आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी शिबिरात तपासणीसाठी आलेल्या मालुताई बसवंत पालकर यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार मानले. या शिबिरात विविध रोगांवरचे 75 तज्ज्ञ डॉक्टर्स आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आमच्या गावात कधीच आले नव्हते. त्यामुळे आम्हाला विविध शारीरिक समस्यांवर सल्ला व उपचार मिळाले अशा शब्दांत समाधान व्यक्त केले. एकंदर आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलेल्या शब्दाला जागून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागातील जनतेची मोठी सोय केली अशी प्रतिक्रिया लोकांनी यावेळी व्यक्त केली.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …