बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव येत्या 1 नोव्हेंबर काळादिनाच्या मुक सायकल फेरीला परवानगी देता येणार नाही, असे बेळगाव पोलीस आयुक्तालयाने लेखी उत्तराद्वारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कळविले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर रोजी निषेधात्मक मुक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली धर्मवीर संभाजी उद्यानातून प्रारंभ होऊन गोवावेस सर्कल येथे समाप्त होणार आहे. त्यानंतर रेल्वे ओव्हरब्रीज नजीकच्या मराठा मंदिर मंगल कार्यालयात सभा घेण्यात येणार आहे.
मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने गेल्या 26 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश तसेच गेल्या 18 ऑक्टोबर 2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार सदर गोष्टींना परवानगी मिळू शकत नाही, अशा आशयाचा तपशील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आयुक्तांच्या स्वाक्षरीने सदर पत्र दळवी यांना धाडण्यात आले आहे. दरम्यान, मूक सायकल फेरीला परवानगी नाकारून लोकशाहीने दिलेला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाकडून हिरावून घेतला जात असल्याबद्दल सीमावासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …