बेळगाव : बेळगाव येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात ११५ वा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. सुरेखाताई पोटे उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, संस्थापक मोहन कारेकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या सुरेखाताई पोटे यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन विठ्ठल शिरोडकर यांनी आपले विचार मांडून महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देऊन आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे आघाडीची कार्यतत्परता बजावत आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, आजची स्त्री ही सुशिक्षित होऊन आपल्या कुटुंबारोबर समाजालाही घडविण्याचे कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर यांनीही आपले विचार मांडून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या सुरेखाताई पोटे यांनी महिलांना शुभेच्छा देऊन महिलांनी अहापल्यासाठी दिवसातून एक तास वेळ दिला पाहिजे व समाज सुधारण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. आज आपल्या महिला प्रत्येक पुरुषांबरोबर काम करीत आहे. त्या प्रत्येक नोकरी, व्यवसायमध्ये योग्यरितीने आपली जबाबदारी पार पाडीत आहे. यावेळी प्रमुग पाहण्यांच्या हस्ते संस्थेच्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक विनायक कारेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, प्रकाश वेर्णेकर, तसेच सभासद विनया कारेकर, मनिषा कोरकर, शशिकांत कणबरकर, जयश्री धुडूम, प्रिती पाटील, माया चंदगडकर, दिपाली सांबरेकर, हेमा सांबरेकर तसेच अनेक महिला सभासद उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका कारेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तृप्ती शहापूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या कर्मचारी वर्गांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta