मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
Belgaum Varta
March 8, 2023
बेळगाव
- बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन महाविद्यालयाच्या महिला संघटना तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पदी प्रा. अर्चना भोसले उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वृषाली कदम यांनी संस्कृत श्लोक प्रस्तुत केले. तद्नंतर प्रा.भाग्यश्री चौगले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. महिला संघटनाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी प्रा. अर्चना भोसले म्हणाल्या की, आजचा युग महिला सबलीकरणाचा आहे. आज महिला अनेक क्षेत्रात आपल्या कर्तुत्व गुणांच्या जोरावर उत्तुंग भरारी घेत आहेत. महिला आपल्याला कमी न लेखता आपल्या मधील गुणांना समाजा समोर आणल्याने आणखीन प्रगती करू शकतात.
यावेळी विशेष आमंत्रिक म्हणून उपस्थित ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी महिला दिना बद्दल सविस्तर माहिती प्रस्तुत करुन भविष्यात महिला अनेक क्षेत्रात कशी प्रगति करु शकतात या बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले की, महिला सशक्त असल्यामुळेच परिवार आणि नोकरी अशा दोहऱ्या जबाबदाऱ्या उचित रूपाने सांभाळत असतात. पुरुष महिलांचा आदर आणि सन्मान करुन त्याच्या पाठीसी उभे राहिले तर त्या आणखीन जोमाने आपले कर्तृत्व गाजवू शकतात.
महिला दिनाच्या निमित्ताने एकलव्य नगर, सागर नगर, कणबर्गी, रामतीर्थ नगरच्या वसाहती मधील महिलाना आणि सिध्देश्वर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींना मोफत सँनेटरी पँडचे वाटप महाविद्यालयातर्फे करण्यात आले.
या कार्यक्रमाला नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली, डॉ. डी. एम. मुल्ला, डॉ. एच. जे. मोळेराखी, प्रा. राजु हट्टी, प्रा. जगदीश यळ्ळुर, डॉ. आरती जाधव, प्रा. एस. आर. नाडगौडा, प्रा. मनीषा चौगुले, प्रा.भाग्यश्री रोकडे, प्रा. सीमा खनगांवकर, प्रा.नूतन. प्रा.वेदा आदी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.भाग्यश्री रोकडे यांनी आभार मानले.
Post Views:
295