बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. तसेच याबाबतची लेखी माहिती त्यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना कळविले आहे.
कोरोनाचे कारण पुढे करत 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुक सायकल फेरीला परवानगी देण्यात येणार नाही, असे लेखी उत्तर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना गेल्या शुक्रवारी कळविण्यात आले होते.
प्रशासनाने काळ्या दिनाच्या सायकल फेरीला परवानगी नाकारली असली तरी कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारचा निषेध नोंदवायचा असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
त्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांची आज शनिवारी बैठक पार पडली. यावेळी चर्चेअंती कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूची व आदेशाचे पालन केले जावे. तसेच त्यासाठी 1 नोव्हेंबर रोजीची मुक सायकल फेरी यंदा रद्द करून त्याऐवजी रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सदर निर्णय लेखी पत्राद्वारे बेळगावच्या पोलीस आयुक्तांना कळविला आहे.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …