
बेळगाव : राजहंसगड (ता. बेळगाव) येथे आज रविवारी (दि. 19) रोजी शिवपुतळ्याचा दुग्धाभिषेक होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार तयारी केली आहे. बेळगावातून शोभायात्रेद्वारे राजहंसगडावर कूच करण्यात येणार असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात, डोक्यावर भगवी टोपी घालून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगडावर 350 वर्षांपूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. तसाच सोहळा राजहंसगडावर आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. या समारंभात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असणार आहे. आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या अनेकांनी सहकार्य केले आहे. मराठी संस्कृती जपून अत्यंत शिस्तीने शोभायात्रा पार पाडावी. महिलांनी पारंपरिक नऊ वारी साडी परिधान करावी, असे आवाहन समितीने केले आहे.
राजहंसगडावर सर्वांना सहजपणे दुग्धाभिषेक सोहळा पाहता यावा यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रत्येकाला यामध्ये सहभाग घेता यावा याकरिता हजारो कार्यकर्ते सेवा बजावत आहेत. दुग्धाभिषेक सोहळ्याची गावोगावी जागृती केली आहे. गावांतून येणार्या लोकांची वाहने थांबवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. हा लोकोत्सव आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta