Wednesday , March 4 2026
Breaking News

13 लाख रुपयांची अवैध रोकड जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील फोर्ट रोडवरील पिंपळकट्टा येथील तपासणी नाक्यावर एका दुचाकी वाहनातून तब्बल 13 लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्यसाठा आणि पैशांची वाहतूक केली जाते. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील फोर्ट रोडवरील पिंपळकट्टा तपासणी नाक्यावर वाहन आल्यानंतर मार्केट पोलिसांनी विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकाऱ्यांसमोर वाहनाची झडती घेतली. बेळगाव शहरात राहणार्‍या एका व्यक्तीच्या ऍक्टिव्हा दुचाकीत लाखो रुपयांची रोकड आढळून आली. रकमेचे मालक असलेल्याकडे विचारपूस केली असता उत्तर मिळाले नाही, आता ट्रेझरी कार्यालयातील सुरक्षा कोठडीत ही रक्कम ठेवली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *