बेळगाव : सर्वोदय कॉलनी हिंदवाडी येथील गार्डनकडे गेल्या काही दिवसापासून एक अनोळखी वृद्ध वास्तव्य करत होते. तेथील नागरिक त्यांना अन्न पाणी देऊन सहकार्य करत होते. आज अचानक त्यांची तब्येत अस्वस्थ वाटू लागली. याची बातमी माधुरी जाधव पाटील फाउंडेशनचे सदस्य सौरभ कुंदप यांना कळताच त्यांनी त्वरित समाजसेविका माधुरी जाधव- पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली माधुरी जाधव यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्या वृद्ध व्यक्तीची विचारपूस केली. त्यांनी आपल्याला अस्वस्थ वाटत आहे त्याकरिता मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असे त्यांनी सांगताच 108 शी संपर्क साधून रुग्णवाहिकेमधून या वृद्ध व्यक्तीच्या हातापायांना जखम झाली होती. पुढे याचा परिणाम वाईट होऊ नये याची दक्षता घेत त्यांना पुढील उपचाराकरिता सिविल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta