कल्लेहोळ : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या हरे कृष्ण प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्री राधाकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
दुपारी 2.00 वाजता रथ यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेला श्री. नागेश मन्नोळकर, श्री. शिवाजी सुंठकर, श्री. धनंजय जाधव. श्री. संजय बी. पाटील. श्री. विनय विलास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रमुख अतिथी यांनी हरिनाम संकिर्तनाचा आनंद लुटला. यात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, कलश पथक, लेझीम पथक, मल्लखांब, बैलगाडी सजावट आणि कीर्तन यांच्यासह मोठ्या उत्साहात श्री भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाले. नाट्यलीला, मलखांब, महाप्रसाद आणि श्री हरी संगीत भजनाचा कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली. संपूर्ण गाव कृष्ण भावनेत न्हावून गेले. युवकांनी ठिकठिकाणी शरबत, पुलावा, कोकम, फळे, पाणी यांचे विपुल प्रमाणात वाटप केले.
ग्रामस्थ महिला व युवक मंडळ यांच्या सहकार्यातून साकारलेली राधाकृष्ण रथयात्रा महोत्सव यावर्षीही मोठ्या उत्साही वातावरणात कार्यक्रम साजरा झाला.