बेळगाव : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीत खोडा घालून बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे कुठेही असा प्रकार झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
मध्यवर्तीच्या बैठकीत खानापूर येथील समितीत बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबाबत चर्चा झाली. यावेळी मनोहर किणेकर यांनी समितीने एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा अशी लोकांची तीव्र भावना आहे. म्हणून खानापूर समितीत कार्यरत असतानाही काहींनी दुही करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी गद्दारी करणाऱ्यांना घरा बाहेर पडू देऊ नका. त्यासाठी गद्दार विरोधी सेना सुरू करावी. घटक समितीत काही पेच निर्माण झाला झाला तर तो सोडवण्याचा आणि पाठपुरावा करण्यासाठी मध्यवर्तीने प्रयत्न करावा असे मत मांडले.
खानापूरचे यशवंत बिरजे आणि गोपाळ देसाई यांनीही त्या घटनेचा निषेध करत आम्ही जोमाने काम सुरू ठेवले असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta