Wednesday , April 22 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते म. ए. समितीत सामील

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे काम करण्यास सज्ज आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीपूर्वी अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेतली. त्यांनी अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, धामणे आदी भागातील शेकडो कार्यकर्ते म. ए. समितीत सक्रीय होणार आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष दीपक दळवी यांनी म. ए. समिती ही सर्वांची आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती जपण्याच्या लढ्यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी सहभागी व्हावे. तुम्हा युवकांचे कौतूक आहे. समितीचे काम करत राहा, अशा सूचना केल्या. यावेळी उमेश कुऱ्याळकर, श्रीकांत कुऱ्याळकर यांच्यासह मध्यवर्ती म. ए. समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *