बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवार निवडण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी मतदार, कार्यकर्ते पदाधिकारी, सभासद, युवक मंडळे व महिला मंडळे यांनी सहकार्य करावे. उमेदवार निवडण्याची पद्धती कशी असावी याबाबत चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3=30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बैठक बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta