बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर आणि श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना शाखा बेळगाव यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाचे बेळगावचे संचालक श्रीमान प्रदीप शेट्टी यांनी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयातील वाचनालय इमारतीसाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत 1 लाखाची देणगी उपलब्ध करून दिले. या निमित्ताने कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विश्व भारत सेवा समिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एन. एफ. कटांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेचे बेळगावचे संचालक श्रीमान प्रदीप शेट्टी यांनी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेअंतर्गत विविध प्रकल्पाची माहिती करून दिली. तसेच आपला ट्रस्ट तळागाळातील गरजूंना निवारा वस्त्र तसेच बचत गटांना कशाप्रकारे प्रोत्साहन करत असतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच प्रदीप शेट्टी व श्रीक्षेत्र धर्मस्थळचे प्रोजेक्ट ऑफिसर मंजुनाथ सर व नागराज सर यांचाही सत्कार संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी व कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे डायरेक्टर श्री. परशराम गोरल, एस. एम. साखळकर, बसवंत एकणेकर, विमल मुचंडी, अश्विनी मॅडम, तसेच महाविद्यालयाचा शिक्षक वृंद व धर्मस्थळ बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता मुतगेकर व आभार प्रदर्शन के. एल. शिंदे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta