बेळगाव : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यामध्ये उत्तम मार्गदर्शन करून त्यांच्या भावी आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारे शिक्षक म्हणजे प्रकाश पाटील होय. खानापूर तालुक्यासारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये 25 वर्ष शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी हलगा येथील प्राथमिक शाळेमध्ये पाच वर्षे आपली सेवा बजावली आहे. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते, त्यांच्या शिकवण्यामुळे आज अनेक विद्यार्थी चांगल्या नोकरीवर, चांगल्या पदावर, व चांगल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत. आज त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार म्हणजेच या विद्यार्थ्यांच्या जीवनातील यश हेच आहे, असे विचार हलगा शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोनाप्पा संताजी यांनी केले.
शुक्रवार दिनांक 31 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा हलगा येथे प्रकाश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
शाळेच्या सहशिक्षिका अश्विनी बागेवाडी यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोनाप्पा संताजी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाबुराव धामणेकर उपस्थित होते. शाळा सुधारणा समितीचे सदस्य अनिल शिंदे, बाळू कामती, संभाजी हनमंताचे, धाखलू बिळगोजी यांनी सरस्वती मातेचे पूजन केले. दीप प्रज्वलन सामाजिक कार्यकर्ते बाबुराव धामणेकर, मोनाप्पा संताजी, निवृत्त जवान बाळू संताजी, शाळा सुदामा समिती उपाध्यक्ष सुजाता कामानाचे, अशा संताजी, रेखा हनमंताचे, स्नेहल सामजी, यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी प्रिया पाटील यांचा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वतीने अध्यक्ष मोनाप्पा संताजी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कन्नड प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक ए. एच. अलाबादी, हलगा सीआरपी अधिकारी एस. एफ. मुल्ला, शारदा माध्यमिक शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक विनोद घाडी, सहशिक्षक शिवाजी बिळगोजी, मोहन देसाई, अनिल नाईक, संजय बेळगावकर यांनी प्रकाश पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या सहशिक्षकात वी जी गाठीबांधे, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अनिल शिंदे, हलगा सीआरपी मॅडम एफ. एस. मुल्ला, यांनी प्रकाश पाटील यांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
मुख्याध्यापक प्रकाश पाटील म्हणाले की, आमचे वडील वामनराव पाटील हे शिक्षक होते. परंतु घरची परिस्थिती तेवढी व्यवस्थित नसल्याकारणाने आम्ही दहावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी घेण्यासाठी आम्हाला खडतर परिश्रम करावे लागले. आम्ही दोन भाऊ व तीन बहिणी असा आमचा मोठा परिवार होता. पदवी घेतल्यानंतर आम्ही शिक्षक ही पेशा रुजू झाल्यावर माझी पहिली नोकरी चोर्ला येथे झाली. चोर्ला येथे शाळेत रुजू झाल्यावर या शाळेची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीदेखील आम्ही तेथील नागरिकांच्या सहकार्यातून या शाळेचा कायापालट केला व पाच वर्षे या शाळेत नोकरी केल्यानंतर मी कामातगा या गावी जवळपास वीस वर्षे शिक्षकी पेशा सांभाळाली आहे. खानापूर तालुक्यामध्ये पंचवीस वर्षे नोकरी केल्यानंतर माझी हालगा येथे बदली करण्यात आली. या गावातील आल्यानंतर शाळेचा विकास करण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सहकार्यातून आम्ही शाळेची रंगरंगोटी केली, शाळेला कंपाउंड तसेच अनेक सुविधा केल्या आहेत. चांगले शिक्षक वर्ग मला भेटल्यामुळे या शाळेत शैक्षणिक दर्जा ही वाढला आहे. शाळेचा विकासही झाला आहे. आज सेवानिवृत्त होत असताना मागील 30 वर्षात जे आम्ही ज्ञानाजणांचे कार्य केले आहे, त्या ज्ञानांजनाच्या कार्यातून आज अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी होत आहेत, एवढेच आम्हाला सुख या शिक्षक पेशातून मिळल आहे. आज शिक्षक पेशातून निवृत्त होताना जड अंतकरण आम्हाला वाटत आहे. तरी येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात ही आम्ही कार्य केल्याचे ठरवले आहे, व आपले कार्य असेच चालू राहील, असे ते म्हणाले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुजाता कामाणाचे, सदस्य अनिल शिंदे, संभाजी हनमंताचे, धाखलू बिळगोजी, बाळू कामती, स्नेहल सामजी, आशा संताजी, सुजाता संताजी, रेखा हनुमंताचे, गीता हनुमंताचे, ज्योती संताजी, अन्नपूर्णा शिंदे, बाबुराव धामणेकर, बाळू संताजी, प्रभारी मुख्याध्यापिका एम. व्ही. चौगुले, सहशिक्षिका व्ही. जी. गाठीबांधे, देसाई, एस. बी. भोसले, आर. एम. घोरपडे, एस. बी. सफारे, ए. लंगोटी, एम. एम. चौगुले, मोहन देसाई, अनिल नाईक, विलास बेळगावकर, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. सहशिक्षिका एस. बी. सपारे यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta