बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्यावतीने आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात. त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांतून निवडक व्यक्तीमधून त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली गेली आहे.
श्री. वाय. एन. मजुकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि पुरोगामी विचारांच्या येळ्ळूरच्या कसदार मातीतून घडलेले आपले व्यक्तिमत्व व महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षण प्रसाराच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी 1972 रोजी वयाच्या 29 व्या वर्षी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाची स्थापना करून येळ्ळुर येथे मुलींसाठी श्री चांगळेश्वरी हायस्कूलची स्थापना केली. जन्मभूमी बेळगाव तालुका असली तरी कर्मभूमी मात्र जाणीवपूर्वक शैक्षणीक व आर्थिक दृष्ट्या मागास अश्या खानापूर तालुका निवडला. काळाची आणि परिस्थितीची गरज ओळखून 1990 मध्ये खानापूर तालुक्याच्या शिवठाण, मणतूर्गे, कारलगा, लोकोळी, गणेबैल यासारख्या ठिकाणी माध्यमिक शाळा काढल्या. सरकारचे कसलेही अनुदान नसताना एक-दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालविल्या खिशातुन प्रसंगी कर्ज काढून ज्ञानदानाचे व्रत चालू ठेवले. अलीकडे शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना शिक्षणाला समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या क्षेत्राचे पावित्र्य कटाक्षाने जपले.
या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केलेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, गोवातर्फे दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तिमध्ये निवड करून आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. वाय. एन. मजुकर यांना पुरस्कार प्रदान करताना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंटचे अरविंद घट्टी आदींच्या हस्ते गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा व मोत्याचा हार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र व गोव्यातील विविध मान्यवर तसेच संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, नरेंद्र मजुकर, संस्थेतील शिक्षक आर. बी. पाटील, जे एम् पाटील, किरण पाटील, विनोद घाडी, शेखर पाटील, संजय पाटील इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta