Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव दक्षिण, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निश्चित?

Spread the love

 

बेळगाव : उमेदवार जाहीर करण्यात अव्वल असणाऱ्या काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवार यादीच्या घोषणेची तयारी केली असून बेळगावमधील दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या उमेदवाराची निवड केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

बेळगाव दक्षिणमध्ये प्रभावती चावडी आणि उत्तरमध्ये राजू सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी असून जवळपास या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून बेळगाव दक्षिण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांतून काँग्रेस पक्ष संघटनेला नवी ऊर्जा देणार्‍या प्रभावती चावडी यांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली असून काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

यानुसार दक्षिण मधून प्रभावती चावडी यांचे नांव निश्चित झाल्याचे समजते. काँग्रेसच्या दक्षिण मतदार संघासाठी रमेश गोरल, प्रभू यत्नट्टी हेदेखील इच्छुक होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी प्रभावती चावडी यांची निवड केल्याचे समजते.

याचप्रमाणे बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे तिकीट राजू सेठ यांच्यासाठी निश्चित झाले असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या तिकीटावरून गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्क-वितर्कांना ऊत आला असून, बेळगाव जिल्ह्यातील चुरशीच्या दोन मतदारसंघांचे पेच दिल्लीत झालेल्या बैठकीत मिटले असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.

याबाबत काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून येत्या एक-दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *