Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजन बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : शहर व उपनगरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केली आहे.

रविवारी सकाळी 10 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे होणार आहे. बैठकीला शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव व सरचिटणीस जे. बी. शहापुरकर उपाध्यक्ष मेघन लंघरकांडे, राहुल जाधव, रवी निर्मळकर, संतोष कणेरी, संपर्क प्रमुख प्रसाद मोरे, आदित्य पाटील, ओमकार पजारी, विनायक बावडेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *