बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी महापौर समितीचे नेते शिवाजी सुंठकर यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. समितीचे समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात हा अर्ज सादर करण्यात आला.
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, एस. एल. चौगुले, पुंडलिक पावशे, दीपक पावशे, नारायण सांगावकर, बी. एस. पाटील, संजय पाटील, संजय पाटील, आदी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta