बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेत बेळगांव शहर आहे. करोडो रुपये स्मार्ट सिटीसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पण अनेक ठिकाणी स्मार्ट विकास मात्र झालेला नाही.
वंटमुरी बेळगाव आणि श्रीनगर बेळगाव येथील शेवट बस स्टॉपची झालेली दुरावस्था पाहून नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने स्मार्ट भ्रष्टाचार होत आहे. मात्र विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसतो विकास मात्र कायच झाले नाही. बेळगाव शहरातील अनेक ठिकठिकाणी बस थांबायची झालेली दुरावस्था पाहून विद्यार्थी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर शहरातील विकास करावा. भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जनतेने आवाज उठवायला हवा तरच हे राजकारणी जागे होतील अन्यथा होणार नाहीत. येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका; साडी, भांडी कोंडी, मिस्कर, कुक्कर, दारू चिकन, मटण, बळी न पडता प्रत्येकाने जबाबदारी घेऊन पुढे जायला हवे……. विकास घडवून आणणाऱ्या व्यक्तीलाच निवडून द्या. मतदारांनी विकासालाच मत देण्यासाठी जागरूक आणि सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर शहरातील विकास करावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta