बेळगाव : आज सायंकाळी जत्तीमठात सार्वजनिक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत २२ एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दि. २४ एप्रिल रोजी होणार पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणूक होणार असून रविवार दि. ३० एप्रिल रोजी राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. प्रारंभी शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजू मरवे यांनी गेल्या वर्षीचा जमाखर्च सादर केला.
त्यानंतर विकास कलघटगी, रणजित हावळाणाचे, मदन बामणे, शुभम शेळके, ओंकार होनगेकर, राम भिंगुर्डे, गणेश दड्डीकर आदींनी आपले विचार मांडले.
विश्वनाथ सूर्यवंशी यांनी तीन दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला.
शंभर वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या चित्ररथ मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यकारणी विषयी चर्चा झाली जुन्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करताना सरचिटणीस म्हणून मदन बामणे यांची तर रमाकांत कोंडूसकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
मोहन कारेकर यांनी आभार मानले.
शिवजयंती उत्सव कार्यक्रम
* २२ एप्रिल २०२३ सकाळी ७ वाजल्यापासून धर्मवीर संभाजी चौकात वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत.
* सकाळी ९ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात पूजन.
* सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवमूर्तीचे विधिवत पूजन.
* २४ एप्रिल २०२३ संध्याकाळी ६ वाजता नरगुंदकर भावे चौकातून पालखीपूजन करून चित्ररथ मिरवणुकीस प्रारंभ.
Belgaum Varta Belgaum Varta