बेळगाव : तीन वर्षाचे बालक १०० फुटाच्या विहिरीत पडले असता त्या बालकाला वाचवणारे आंबेवाडी गावचे सुपुत्र राहुल कातकर यांचा सत्कार युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केला.
यावेळी बोलताना आर. एम. चौगुले यांनी राहुलच्या धाडसाचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले.
आंबेवाडीमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, एन. के. कालकुंद्री, माजी तालुका पंचायत सदस्या कमल मनोळकर, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाऊ तुडेकर, सागर कटगेन्नवर, मल्लाप्पा सांबरेकर, महेश कणबरकर, विनोद कातकर, सुधीर मनोळकर, युवराज मजुकर, राजू सांबरेकर व गावातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta