Wednesday , March 4 2026
Breaking News

लक्ष्मण सवदी भाजपचा राजीनामा देणार!

Spread the love

 

बेळगाव : अथणीतून भाजपचे तिकीट गमावल्यानंतर नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या माजी आमदाराने लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते.
भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यादृष्टीने माजी आमदार राजू कागे यांच्या माध्यमातून लक्ष्मण सवदी यांना पक्षात आणण्याची तयारी चालवली आहे.
कागवाड येथील काँग्रेसचे माजी आमदार राजू कागे यांनी लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन काही वेळ चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सवदी म्हणाले की, तिकिटासाठी फसवणूक करणाऱ्या पक्षात राहू शकत नाही. त्यामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. उद्या मतदारांचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *