बेळगाव : आषाढी एकादशी निमित्ताने श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी श्री. बसु महाराज बोलते वेळी म्हणाले की, वाढदिवसाला अनेक वेगवगळ्या वस्तु शुभेच्छा देतात पण माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या वाढदिवसाला बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके युवा समितीचे अध्यक्ष यांनी झाडे देवून त्यांना सन्मानित केले होते. त्या झाडांचे वृक्षारोपण आज वैष्णव सदन आश्रमाच्या आवारात करण्यात आले.
झाडाचे महत्त्व म्हणजेच झाडाविना ढग गेले, ढगविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृध्दी गेली, समृध्दी विना सारे हलादील झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले.
निसर्ग म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा, त्यासाठी “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व भक्तांना श्री बसु महाराज यांनी दिला आहे.
दुद्दाप्पा बागेवाडी बोलताना म्हणाले, “निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली झाडे आपले सगेसोयरे आहेत”. कारण झाडांमुळे पाऊस वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला की शेतिभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते व मनुष्याला ऑक्सिजन मिळतो. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे.
या प्रसंगी ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, मधू पाटील, अनिल पाटील, रमेश पाटील, सी. एम. पाटील, बी. एम. पाटील, आप्पा होनगेकर, विशाल पाटील, प्रवीण पाटील, अजित सांबरेकर, बुवा महाराज, हणमंत धामणेकर, मधु हट्टीकर इतर उपस्थित होते. अजित पाटील यांनी आभार मानले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …