बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले हे रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक आठ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर बेळगाव तालुक्याचे ग्रामदैवत असलेले उचगांव येथील मळेकरणी देवीचे पूजन व आरती सकाळी ठीक साडेआठ वाजता होऊन प्रचार कार्याचा शुभारंभ होणार आहे.
यानंतर उचगाव गावामध्ये प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यानंतर गोजगे व मण्णूर गावामध्ये होणार आहे.
तसेच रविवार दिनांक १६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता सदाशिवनगर येथील फर्स्ट मेन फर्स्ट क्रॉस सीटीएस नंबर 4855/76 वननेस कॉम्प्लेक्स (लक्ष्मी कॉम्प्लेक्स पाठीमागे) येथे म. ए .समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी निवड कमिटीच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील,यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta