Friday , July 26 2024
Breaking News

सांबरा विमानतळ ते बेळगाव ‘रेलबस’ सुरु करा; सीटीझन्स कौन्सिलची मागणी

Spread the love

बेळगाव : सांबरा विमानतळापासून बेळगावला येण्यासाठी त्वरित रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन सीटीझन्स कौन्सिलने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना मंगळवारी सायंकाळी दिले. या निवेदनाची प्रत केंदिय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांना पाठवून देण्याची विनंती करण्यात आली. आपण या मागणीचा गांभिर्याने करुन त्याची कार्यवाही होण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, अशी ग्वाही राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
निवेदनात कौन्सिलने म्हटले आहे की, बेळगाव विमानतळ हे देशातील महत्त्वाच्या शहराना जोडले गेले असून विमानतळावर वाढत्या प्रवासी संख्येमुळे महत्व आले आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु याच विमानतळावरून प्रवाशांना बेळगावला येण्यासाठी रेलबस किंवा अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांच्या सोईसाठी विमानतळ ते बेळगाव शहर दरम्यान रेलबस सुरु करावी.
सांबरा विमानतळावरील दिल्ली, मुंबई, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद, पुणे येथे प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. विमानतळावर आलेल्या प्रवाशाला किंवा बेळगावहून विमानतळावर जाणार्‍या प्रवाशाला रिक्षा किंवा टॅक्सी शिवाय कोणताही पर्याय नाही. मात्र त्यांचे अनुक्रमे 1500 ते 1000 रूपये पर्यंतचे भाडे अवास्तव आहे. बेळगाव रेल्वे स्टेशन हे महत्वाचे स्टेशन असून, बेंगळूर आणि मुंबईला येथून रेल्वे सुविधा आहेत. सांबर्‍याला सुद्धा रेल्वेस्टेशन असून ते बेळगाव विमानतळाला अतिशय जवळचे आहे. सर्व संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध असून, त्याचा उपयोग विमान प्राधिकरणाने करून घ्यावा व त्वरित रेलबस किंवा रेल कारची सुविधा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारतातील अन्य विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे. रेलबसच्या सुविधामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. आणि प्रवास करणेही सुकर होणार आहे. परिणामी विमान प्रवास करणार्‍यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार करून विमान प्राधिकरणाने रेल्वे खात्याशी लवकरात लवकर चर्चा करून परस्पर समन्वयाने प्रवाशांच्या सोयीसाठी रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
सदर निवेदन कौन्सिलचे अध्यक्ष सतिश तेंडुलकर, अरूण कुलकर्णी, विकास कलघटगी यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. दत्तात्रय देसाई यांचा ‘दस्तक ..अनसुनी आहट’ हा हिंदी कविता संग्रह प्रकाशित

Spread the love  बेळगाव : बेळगावचे सुपत्र डॉ. दत्तात्रय ज्ञानदेव देसाई यांचा पहिला कविता संग्रह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *