बेळगाव : येथील अनगोळ रोड स्थित दि. आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या 31व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे कर्मचारी, सभासद व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात डेक्कन मेडिकल सेंटरचे तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात ईसीजी, रँडम ब्लड शुगर, यूरिक ऍसिड, फिजिओथेरपी, एच बी, एच बी वन सी, रक्तदाब, डोळे व संधिवात यासारख्या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन उपचार केले जाणार आहे. याचबरोबर चाळीस वर्षावरील महिलांना सामान्यपणे भेडसावणाऱ्या शारीरिक व्याधीबाबतही महिला डॉक्टर्सकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांनी आपले नाव नोंदणे आवश्यक असून त्यासाठी संस्थेचे कर्मचारी राजू बडवाण्णाचे यांना 9141582879 किंवा सी ई ओ पी बी माळवी यांना 86949 41720 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. ए. एल. गुरव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta