बेळगाव : येळ्ळूर येथील जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळाला सोडण्यात येणारी पाणी व्यवस्था सुरळीत नसल्याने येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून चांगलाच जाब विचारला.
आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. कोट्यवधी खर्चून सुरू झालेली जल जीवन मिशन योजनाही धोक्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळाला सोडण्यात येणारे पाणी सुरळीत नसल्याची तक्रार येळ्ळूर आणि अवचारहट्टी ग्रामस्थांनी केली आहे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा पाणी येते, त्यातूनही पूर्ण पाणी मिळत नाही. काही ठिकाणी तर अनेक घरांच्या नळांना पाणीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केलीय. बांधकाम करताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी दिनांक 27-04-2023 रोजी महात्मा फुले गल्ली, इंदिरानगर, या ठिकाणी गेले कित्येक दिवस पाणी आलेलं नाही त्यामूळे संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारानां बोलावून त्यांना धारेवर धरत प्रत्यक्षदर्शी गावातील स्थिती दाखवत लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी वन वन आणि त्यांचे होणारे हाल यावर तूम्ही कधी लक्ष देणार असा सवाल केला. तसेच जर गावात 200% पाण्याचे नळ असतील तर त्यातील फक्तं 150% नळानांच पाणी येत आहे.. मग राहिलेल्या 50% लोकांनी कूठे जावं? याविषयी अनेकवेळा तक्रार करूनही आणि ही बाब अधिकारी आणि कंत्राट दारांच्या सातत्याने निदर्शनास आणून देखिल अजूनही याबाबात कोणतच ठोस पाऊल का उचलल गेलं नाहीय? असा प्रश्नही सतीश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याना विचारला.
पीएचई विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या सुस्त वृत्तीमुळे हे अभियान धोक्यात आलं असुन. ज्या घरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी करण्यात आली आहे, तेथेही पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरात नळ असूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आणि हे अत्यंत चुकीचं आहे त्यामूळे लवकरात लवकर ते नळ कनेक्शन ठीक करून, योग्य रीतीने प्रत्येक घरात टप्प्या टप्प्याने अगदी वेळेत लोकांना पाणी पुरवठा करावा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी संबधीत अधिकाऱ्याना दिला.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रूपा पुण्ण्यान्नवर, दलित संघटनेचे लक्ष्मण छत्र्यान्नवर, प्रमोद सूर्यवंशी, भीमराव पुण्ण्यान्नवर, पीएचई विभाग अधिकारी, कंत्राटदार आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta