उचगाव : मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकविण्यासाठी जिवाचं रान करावं लागेल, ही स्वाभिमानाची लढाई असून प्रत्येकाने आपल्या माय मराठीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले.
अतिवाड येथे शुक्रवारी सकाळी प्रचार-पदयात्रा काढण्यात आली यावेळी ते बोलत होते.
चौगले पुढे म्हणाले, समितीच्या ग्रामीण उमेदवाराला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची झोप उडाली आहे. गावो-गावी प्रचारात तरुणाचा सहभाग वाढू लागला आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
छ. शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी इंदिरानगर, गणपत गल्ली, तानाजी गल्ली, मारुती गल्ली मार्गे प्रचार फेरी मार्गस्थ झाली. प्रचार फेरीत युवा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, समिती नेते मनोज पावशे, पुंडलिक पावशे, मधु बेळगावकर, ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, विद्या पाटील, आनंद पाटील, विजय पाटील, यल्लाप्पा पाटील, संतू पाटील, केदारी पाटील, हणमंत पाटील, शंकर पाटील, अश्विनी पाटील यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta