बेळगाव : दि. २७ रोजी सायंकाळी बेळगाव उत्तर मतदार संघातील गांधीनगर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांचा प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. सुरवातीला किल्ला येथील दुर्गाडी देवीला नतमस्तक होऊन अमर यळ्ळूरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. गांधीनगर भागात महिलांनी प्रचार मार्गावर रांगोळ्या घालून सामूहिक ओवाळणी करत अमर यळ्ळूरकर यांचे जल्लोषी स्वागत केले. अमर यळ्ळूरकर यांचे प्रचार चिन्ह असलेली घागर डोक्यावर घेवून प्रचारात रंगत आणली आहे. गांधीनगर येथील नृसिंह मंदिरात आशीर्वाद घेत संपूर्ण गांधीनगरमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गांधी नगरमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा जयघोष बुलंद करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच अतिषबाजी करून उत्साहात अमर यळ्ळूरकर यांचे स्वागत करून समितीला विजय करण्याचा निर्धार गांधीनगर नगरवासियानी केला. यावेळी दुर्गामाता महिला मंडळ, जय हनुमान युवक मंडळ, विर अर्जुन युवक मंडळ, शिवप्रेम मित्र युवक मंडळ आदी मंडळाच्या महिला व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा अमर यळ्ळूरकर यांना जाहीर केला. ठिकठिकाणी मंडळांच्या फलकावर लिहून महाराष्ट्र एकिकाक्रान समितीचे उत्तर मतदार संघाचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला होता. यावेळी लक्ष्मी पालकर, शीतल केसरकर, वीणा पाटील, रेश्मा धामनेकर, बाळू तवनोजी, विश्वजित वंटमुरकर, संजय चौगुले, चंद्रकांत कोंडूस्कर, प्रशांत डांगे, संतोष धुडूम, नागेश कटारे, निलेश कटारे, बबन सदनेकर, मनोहर मंडोळकर, शिवाजी कालकुंद्रिकर, विशाल अपटेकर, नागेश मंडोळकर, राजू मुतकेकर, रवी निर्मळकर यांच्यासह भागातील अनेक महिला, युवक, पंच, समितीचे आजी माजी नगरसेवक, जेष्ठ नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta