Tuesday , December 16 2025
Breaking News

भारत नगर परिसरात रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचारात झंझावात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी पदयात्रा शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी नाथ पै सर्कल शहापूर येथून पदयात्रा आणि प्रचार फेरीची सुरुवात झाली. बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मरण करण्यात आले. यांच्या सीमाभागातील चळवळीतील योगदान खूप मोठे आहे हे कदापि विसरणार नाही. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असा निर्धार करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मी रोड, सर्वोदय कॉलनी, मेघदूत सोसायटी, कर्मचारी वाडा, भारत नगर पहिली गल्ली, भारत नगर दुसरी गल्ली, भारत नगर तिसरी गल्ली, खासबाग, बसवान गल्ली, धामणे रोड, भारत नगर क्रॉस नंबर सहा, सात, आठ येथील परिसर रयत गल्ली ढोरवाडा या ठिकाणी पदयात्रेची सांगता करण्यात आली.

यावेळी स्वागत व प्रस्ताविक महादेव पाटील यांनी केले. शहापूर परिसरात ठिकठिकाणी रमाकांत कोंडुसकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि हार घालून सन्मान करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात केला. संपूर्ण भागात माय मराठीच्या जागरणासाठी जनसमुदाय एकवटला होता. सर्वत्र भगवे वातावरण झाले होते. भगव्या पताका, झेंडे, टोप्या, फलक झळकत होते आणि सीमा संघर्षाच्या सीमा लढ्यातील घोषणांनी येथील परिसर दणाणून सोडला. वेगवेगळ्या महिला मंडळांनी सहभाग दर्शवून रमाकांत कोंडुसकर यांचे आरती ओवाळून औक्षण करून स्वागत करण्यात आले; ज्येष्ठ नागरिकांसह युवकांनी तसेच महिलांनी विजयाची नांदी घडून यावी यासाठी मनापासून शुभेच्छाही देण्यात आल्या.

यावेळी ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे नेते महादेव पाटील शेतकरी संघटनेचे नेते राजू मरवे, बाबू कोले, श्रीधर खन्नूकर, अनिल अमरोळे, श्रीधर पाटील, विराज मुरकुंबी, माजी नगरसेवक अनिल पाटील, दिनेश राऊळ, शिवराज शिंदे, शिवराज पाटील, उमेश पाटील, गणपत बामणे, प्रभाकर अष्टेकर, किरण हुद्दार, राजू बिरजे, माजी नगरसेवक विजय भोसले, यांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ घालून सन्मान करण्यात आला.

गणेश उत्सव मंडळ भारत नगर शेतकरी संघटना रयत गल्ली ढोरवाड्यातून मोठ्या पाठिंबा गणेश युवक मंडळ भरत नगर तिसरा क्रॉस यांचा पाठिंबा मिळाला.
यावेळी प्रशांत भातकां, विजय हंडे, सुनील बोकडे, श्याम कुडूचकर, सागर पाटील, भैय्या होसुरकर, उमेश पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, विशाल कंग्राळकर,सुनील मादर, उदय पाटील, सागर गुंजीकर, नारायण पाटील तसेच समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *