
बेळगाव : शनिवार दिनांक. २९ रोजी सायंकाळी सहा वाजता बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील युवा आमदार श्री. रोहित पवार यांची जाहीर सभा क्रांतिसिंह नानापाटील चौक चव्हाट गल्ली या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगर गल्ली, शेट्टी गल्ली, आणि चव्हाट गल्ली या भागात समिती उमेदवाराच्या भव्य प्रचार फेरीत आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत. खडक गल्ली येथून प्रचाराला सुरुवात होणार असून प्रचाराची जय्यत तयारी भागातील युवक मंडळांकडून करण्यात आली आहे. तरी समितीप्रेमी नागरिक, महिला मंडळे, आजी माजी लोकप्रतिनधी, पंच मंडळी, जेष्ठ नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रचार फेरी ठीक सहा वाजता सुरू होईल.
Belgaum Varta Belgaum Varta