
बेळगाव : दिनांक 28 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदार संघातील अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूरकर यांचा बेळगाव शहराला लागून असलेल्या कॅम्प भागातील लोकवस्तीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. कॅम्प भागातील श्री. मुत्तू मरियम्मा देवी मंदिर मरी माता दुर्गामाता मंदिर मरियम्मा देवी मंदिर आदी ठिकाणी अमर यळ्ळूरकर यांनी दर्शन घेत कॅम्प भागातील प्रमुख मार्गांवरून तसेच गल्ली भागातून प्रचार फेरी काढले. यावेळी या विभागातील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच ठिकठिकाणी महिलांनी आरती ओवाळून अमर यळ्ळूरकर यांचे स्वागत केले. कॅम्प भागातून सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय होता. यावेळी उदय मोरे, प्रशांत कांबळे, तीर्थराज पिल्ले, रितेश कांबळे, वसंत जुवेकर गणेश महेंद्रा दामोदर पुजारी गणेश पुजारी भालचंद्र पुजारी केटी पुजारी अँड सन्स आधी कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते सोबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta