


बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांची प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे. शहरी भागातील उदंड प्रतिसादानंतर उत्तर मतदारसंघातील उपनगरीय भागामध्ये सुद्धा अमर यळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा जनतेतून मिळत आहे. नेहरूनगर, अयोध्या नगर, सदाशिवनगर, जाधव नगर, हनुमान नगर आदी भागांमध्ये प्रचारादरम्यान मराठी लोकांनी अमर यळ्ळूरकर यांचे जल्लोषी स्वागत केले. याही भागांमध्ये ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली महिला वर्गातून अमर यळ्ळूरकर यांचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहरातील शेवटचे आमदार स्वर्गीय नारायणराव तरळे यांच्या घरी प्रचाराप्रसंगी भेट देण्यात आले. येथे नारायणराव तरळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा बेळगाव शहराला समितीचा आमदार मिळावा अशी भावना तरळे कुटुंबीयातून व्यक्त करण्यात आली. त्यांची भावना सत्यात उतरविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जोमाने कार्य करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. या भागातील समितीनिष्ठ अनेक जेष्ठ दिग्गज लोकांकडून अमर यळ्ळूरकर यांच्या विजयासाठी आशीर्वाद देण्यात आले. यावेळी सौरभ पाटील, शिवराज जाधव, सुदर्शन, प्रशांत दळवी, निंबाळकर, कुट्रे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
उद्या दि. १ मे रोजीचा प्रचार मार्ग
सकाळी आठ वाजता गणेश चौक रिक्षा स्टॅन्ड शाहूनगर येथून सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण शाहूनगर मार्कंडेय नगर व एपीएमसी या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात येईल तरी या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
संध्याकाळी चार वाजता बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी यांच्यातर्फे अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. तरी महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
संध्याकाळी ठीक सात वाजता शहरातील हेमू कलानी चौक येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव कुमार रोहितदादा पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पारनेरचे आमदार श्री. निलेश लंके उपस्थित राहणार आहेत तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta