बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असताना देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाल्यामुळं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
यावेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळं मराठी भाषिक कार्यकर्त्यांत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच समितीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगाव दाखल झाले आहेत. फडणवीस येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने टिळक चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभेपर्यंत जाऊ दिलं नाही, तसंच अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून माघारी पाठविण्यात आलं. तर, अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळं मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta