Saturday , December 13 2025
Breaking News

समितीचे उमेदवार निवडून देण्याचा मराठी वकील संघटनेचा निर्धार; समितीच्या पाचही उमेदवारांना जाहीर पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. ॲड. अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषेत वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल टपालवाले हे होते. यावेळी वकील संघटनेचे जेष्ठ वकील ॲड. नागेश सातेरी यांच्या हस्ते बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांना हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच बेळगाव ग्रामीणचे उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांनाच देखील सन्मान करण्यात आला.

या बैठकीला बोलताना माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी एक उत्तम उमेदवार बेळगाव उत्तर मतदार संघासाठी दिला आहे. आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे त्यांनी नमूद केले. आपल्या घरची, नातेवाईक तसेच ओळखीच्या लोकांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त मते समितीच्या उमेदवाराला मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी ऍड सांबरेकर, देशात सध्या बघा या पैशाचा बळावर केलेला बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात त्या या परिस्थितीला अपवाद आहे. रात्र वैऱ्याची आहे. डोळ्यात तेल घालून जाग राहा कारण यावेळी मराठी भाषेसाठी संघटित पणे काम केले पाहिजे.
एक उमेदवार देवून समितीने विजयाची पहिली पायरी गाठली आहे. त्यांना विजयी करून कळस गाठायचा निश्चय यावेळी सर्वांनी करूया असे जाहीर केले. यावेळी महाराष्ट्रातील नेते बेळगावात येवून समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच महाराष्ट्र एकिकरण समितीचे बेळगाव भागातील पाचही उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन करण्यात आले आणि तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
वकील ए. एम. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, वाय वाय पाटील, एस जी जायनाचे, व्ही एम देसाई, सी.बी.पाटील, बिळगोजी, सडेकर, अजय सातेरी, महेश बिर्जे, सुहास जेलगुंडे, गजानन पाटील, टी वाय होनगेकर, पी.आर शिंदे, सुनील काकतकर, यशवंत सुतार, शंकर नावगेकर, प्रवीण साबरेकर, कमलेश मायन्नचे, श्रीकांत कांबळे, महेश मोरे, अंकित खटावकर, श्रीनाथ कलोजी, नारायण खनगावकर, महेश मजुकर, शिवा सोहरत, प्रथमेश कारेकर, सुहास किल्लेकर, सौरवसिंह पाटील, दिवटे, एम एस शिंदे, एस बी रामन, शहाजी शिंदे, प्रशांत सामजी, पी एस लोबो, शंकर पाटील, एस एल मास्ते, वाय टी नाईकर आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *