Saturday , March 7 2026
Breaking News

अनगोळ भागात रमाकांत कोंडुसकर यांना अभूतपूर्व पाठिंबा!

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे.

आज अनगोळ भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीला प्रतिसाद दिला. महिलावर्गाकडून प्रत्येक ठिकाणी रमाकांत कोंडुसकरांचे औक्षण करण्यात येत होते. याचप्रमाणे पुष्पवृष्टी करून जागोजागी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रचारफेरीदरम्यान अबालवृद्धांसह प्रत्येकाचा उत्साह अभूतपूर्व होता. ठिकठिकाणी रमाकांत कोंडुसकर आणि समितीच्या विजयाच्या घोषणांनी अनगोळ परिसरात चैतन्य संचारले होते. प्रचारफेरीत निवडणूक चिन्ह डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

रमाकांत कोंडुसकर यांना मिळत असलेला अभूतपूर्व पाठिंबा पाहता येत्या निवडणुकीत मराठी भाषिकांनी समिती आणि कोंडुसकर यांच्यासह सीमाभागातील पाचही जागांवर उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात झालेल्या दडपशाहीचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचललेल्या मतदारांनी रमाकांत कोंडुसकर यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना पाठिंबा दर्शविला असून येत्या १० मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी आपल्या मतदानातून याचे प्रत्त्युत्तर देण्याचा विदाही दक्षिण मतदार संघातील जनतेने उचलला आहे.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *